4 Jan 2011मटा ऑनलाइन वृत्त । मुंबई खासगी बस वाहतूकदारांना टक्कर देण्यासाठी एसटी महामंडळाच्या ताफ्यात यंदाच्या वषीर् ६० व्होल्व्हो बसचा समावेश होत आहे. यामध्ये प्रत्येकी एक कोटी रुपयेे किमतीच्या दोन जम्बो व्होल्व्होंचा समावेश असून त्यामध्ये विमानातील बिझनेस क्लासप्रमाणे सेमी स्लीपरची व्यवस्था असेल. एक जम्बो बस मुंबई-पुणे आणि दुसरी बस मुंबई-पुणे-बेंगळुरू मार्गावर धावेल. पुण्याच्या मार्गावरही व्होल्व्हो बसची संख्या वाढवली जाणार आहे. एसटी महामंडळाने प्रवासी वाढवा अभियान सुरू करतानाच प्रवाशांना आकषिर्त करण्यासाठी ६० व्होल्व्हो बसेस घेण्याची महत्त्वाकांक्षी योजना आखली आहे. त्यातील २५ व्होल्व्हो बसेसची खरेदी करण्यात येणार असून उर्वरित ३५ व्होल्व्हो बस भाडेतत्त्वावर घेतल्या जातील. फेब्रुवारीमध्ये पहिली व्होल्व्हो बस ताफ्यात दाखल होईल. एप्रिलपर्यंत सर्व २५ बस येतील, अशी माहिती महामंडळाचे व्यवस्थापकीय संचालक दीपक कपूर यांनी दिली. ३५ बस भाडेतत्त्वावर घेण्याचा ठरावही महामंडळात मंजूर झाला आहे. जूनपर्यंत या बसेस दाखल होतील. फेब्रुवारीत पहिली जम्बो येईल. शिवनेरीप्रमाणे जम्बो बसचेही नामकरण होईल. त्यासाठी सहा-सात नावे सुचवली आहेत. ............. नवे मार्ग
|
Tuesday, January 4, 2011
एसटीचा 'बिझनेस क्लास' प्रवास
Subscribe to:
Post Comments (Atom)
No comments:
Post a Comment