Tuesday, June 1, 2010

एसटी होणार 'डिझायनर'_article in Maharashtra Times

एसटी ही 'लाल डब्याचीच, ही इमेज सहा दशकांनंतरही कायम आहे. पण, आता एसटीचा चेहरामोहरा बदलून अधिक आकर्षक बनवला जाणार आहे. 'आयआयटी-मुंबई'च्या इंजिनीअरांच्या मदतीने बसेस 'एरोडायनॅमिक' करण्याची योजना एसटीने आखली आहे. त्यामुळे बसेसचा 'लुक' बदलेलच इंधनातही बचत होईल.

एसटी मंगळवारी ६३ व्या वर्षांत पदार्पण करत आहे. प्रवास अधिक सुरक्षित आणि आरामदायी बनवण्यासाठी एसटीने ही योजना राबवण्याचे ठरवले आहे. त्यावर आयआयटीचे इंजिनीअर अभ्यास करत असून ऑक्टोबरपर्यंत त्यांचा अहवाल एसटीला मिळेल. त्यानंतर बोर्डाची मंजुरी घेऊन टेंडर प्रक्रिया सुरू होईल, असे महामंडळाचे एमडी दीपक कपूर यांंनी सांगितले. महामंडळाच्या ताफ्यात सुमारे ८५ टक्के बसेस 'परिवर्तन' मॉडेलच्या आहेत. त्यांचा चेहरा प्रथम बदलला जाईल. मग, सेमीलक्झरी एरोडायनॅमिक होईल, अशी माहिती कपूर यांनी दिली. बस बांधणीत अॅल्युमिनियमऐवजी 'माइल्ड स्टील'चा वापर करण्याची योजना आहे. त्याचा अभ्यासही आयआयटी मुंबई करत आहे. अॅल्युमिनियम वजनाला हलके असल्याने बसचे वजन कमी होऊन डिझेलचे 'अॅव्हरेज' वाढू शकेल. पण, अपघात झाला तर अशी बस कापली जाते. अनेकदा समोरासमोर टक्कर होते. अशा अपघातात प्राणहानी वाढते. मजबुतीसाठी माइल्ट स्टीलचा वापर केला जाईल. त्यामुळे बसचे वजन वाढून डिझेलचे 'अॅव्हरेज' कमी होईल. उपाय म्हणून बसच्या पुढील भागासाठी 'माइल्ड स्टील'चा वापर केला जाईल.

No comments:

Post a Comment