Friday, November 6, 2009

ST's new project has some teething problems

ST's new project of electronic tickets has some teething problems. Hope they sort it out soon.
All the best ST !!
-------
एस. टी.च्या इलेक्ट्रॉनिक तिकिटाचा प्रवाशांना भुर्दंड
http://loksatta.com/index.php?option=com_content&view=article&id=21228:2009-11-05-19-01-45&catid=25:2009-07-09-02-01-06&Itemid=2

एस. टी. महामंडळाने इलेक्ट्रॉनिक तिकीट मशीनद्वारे तिकीट देण्याचे लांब पल्ल्यांच्या गाडय़ांमध्ये प्रायोगिक तत्त्वावर सुरू केले आहे. परंतु विभागीय नियंत्रकांनी दिलेल्या अपूर्ण माहितीमुळे प्रवाशांना भुर्दंड सोसावा लागत असल्याने ही नवीन ईटीएम मशीन सेवा प्रवाशांना व वाहकांना डोकेदुखी ठरत आहे. मुंबई- मालवण या लांब पल्ल्याच्या एस. टी.मध्ये वाहकाकडे इलेक्ट्रॉनिक तिकीट मशीनची सेवा आहे. रामवाडी (जि. रायगड) या बसस्थानकावरून बसलेल्या प्रवाशांना नागोठणे किंवा कोलाड या थांब्यावर उतरण्यासाठी इंदापूर येथील तिकीट घेऊन व जास्त भाडे देऊन प्रवास करावा लागतो. याबाबत वाहकाला विचारले असता त्यांनी सांगितले की, या मार्गावर नागोठणेकोलाड हे थांबे आहेत, परंतु या थांब्याचे भाडे व थांब्याची नावे माझ्याकडे असलेल्या तिकीट मशीनमध्ये नसल्याने आपणाला इंदापूर थांब्याचे तिकीट घेतल्याशिवाय प्रवास करता येणार नाही.प्रवाशांच्या गरजेनुसार आणि सोयीनुसार नवीन योजना राबविताना सुरुवातीस काही त्रुटी राहतील, याची कल्पना प्रवाशांना आहेच, परंतु प्रचलित तिकिटे देण्याची सोयसुद्धा वाहकाकडे प्रायोगिक तत्त्वावर योजना राबविताना असायला पाहिजे, हेही प्रवाशांचे म्हणणे तितकेच खरे आहे. याबाबत मुंबई विभागीय नियंत्रकाशी दूरध्वनीवरून संपर्क साधला असता मुंबई-मालवण ही गाडी सिंधुदुर्ग विभागीय नियंत्रकाच्या अखत्यारित असल्याने तुमची तक्रार त्यांच्याकडे करावी, असा सल्ला त्यांनी दिला. या गाडीसाठी ईटीएम मशीनच्या सॉफ्टवेअरमध्ये गाडीचे थांबे व भाडे याची माहिती सिंधुदुर्गहूनच मागविण्यात आली होती, अशीही माहिती मुंबई विभागीय नियंत्रकांनी दिली.प्रस्तुत वार्ताहराने सिंधुदुर्ग विभागीय नियंत्रकांना याबाबत विचारणा केली असता प्रथम त्यांनी सांगितले की आमच्या विभागात ही सेवा कुठेही सुरू नाही, तुमची तक्रार चुकीची आहे. बरीच चर्चा झाल्यानंतर त्यांनी सांगितले की, मुंबई- मालवण या बसमध्ये चिपळूणपर्यंत मुंबई येथील वाहक व चालक असतात. त्यांच्याजवळ ही मशीन असते, त्यामुळे तुमची तक्रार मुंबई येथे करा. अशाप्रकारे दोन्ही विभागीय नियंत्रकांनी आपली चूक नाही, हे पद्धतशीरपणे दाखवून हात वर केले. प्रवासी जनता आणि एस. टी.मध्ये अतूट नाते असून एस.टी.च्या सेवेबाबत प्रवाशांनी केलेल्या तक्रारीची दखल घेतली जावी व अधिकारी वर्गाने केलेल्या उडवाउडवीची चौकशी वरिष्ठांनी करावी, अशी मागणी होत आहे. प्रायोगिक तत्त्वावर ईटीएम मशीन असेपर्यंत कागदी तिकिटे सोबत ठेवावीत, अशीही मागणी होत आहे.

No comments:

Post a Comment