27 Dec 2010
म. टा. प्रतिनिधी
मुंबई पुणे मार्गावर एसी शिवनेरी बसला मिळणारा वाढता प्रतिसाद पाहून एसटी महामंडळाने दादर स्वारगेट अशी मसिर्डिझ बेन्झची नवी शिवनेरी बससेवा सुरू करण्याचा निर्णय घेतला असून ही सेवा आज सोमवारी उद्घाटन होत आहे. दहा टायरची ही एअर सस्पेंशन बस डबल एक्सेल असल्याने अधिक आरायमदायी आहे.
दादरहून निघालेली ही बस मैत्रीपार्क, वाशी हायवे, कळंबोली, मेगाहायवे, वाकड, चांदणी चौक कोथरुड मागेर् स्वारगेट अशी जाईल.
ही बससेवा प्रायोगिक तत्त्वावर सुरू केली आहे. प्रवाशांना परतीच्या तिकीटासह आरक्षण सुविधा इंटरनेटवर उपलब्ध आहे.
बसची वेळ-
दादर : स. ७.३०, सायं. ४ स्वारगेट : दु. १२, रात्री ८
प्रवासी भाडे
दादर ते स्वारगेट :
प्रौढांसाठी २८० रु.,
लहान मुलांसाठी १४५रु.
वाशी हायवे ते स्वारगेट : प्रौढांसाठी २५०रु.
लहान मुलांसाठी १३० रु.