Monday, September 20, 2010

एसटीचाही 'गरीबरथ' — महाराष्ट्र टाइम्स

दादर-पुणे एसी सेमीलक्झरी धावणार
20 Sep 2010




एसटीचाही 'गरीबरथ'
' शीतल'चे तिकीट १९० रुपयांच्या घरात

राजेश चुरी । मुंबई

' दुरांतो' आणि 'गरीबरथ' ट्रेनच्या धर्तीवर मध्यमवर्गी प्रवाशांना कमी किंमतीत एसी प्रवास करता यावा, यासाठी एसटी महामंडळाची 'शीतल'नावाच्या ब्रँडची नवीन एसी सेमीलक्झरी बस दादर-पुणे मार्गावर पुढील आठवड्यापासून सुरू होत आहे. एसी असलेली सेमीलक्झरी बस सर्वप्रथम रस्त्यावर आणण्याचा बहुमान संपूर्ण देशात एसटी महामंडळाने पटकावला आहे.

एसटी महामंडळाच्या 'शीतल' या बसचे उदघाटन २७ सप्टेंबरला परिवहन मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांच्या हस्ते होईल. निळा केशरी व पांढरा अशी आकर्षक रंगसंगती या बससाठी निवडण्यात आली आहे. एअरसस्पेन्शन असलेली ही बस प्रवाशांची प्रचंड गदीर् असलेल्या दादर-पुणे मार्गावर धावेल. या मार्गावरील व्होल्व्हो बसचे तिकीट २५०रु. आहे, तर एशियाडचे तिकीट १५०रुपये आहे. एशियाडपेक्षा ३० ते ४० रुपये अधिक मोजण्याची तयारी असलेल्या प्रवाशांसाठी 'शीतल' हा नवीन ब्रँड येत आहे.

टाटा कंपनीच्या या बसची बांधणी 'ऑटोमोबाईल कॉपोर्रेशन ऑफ गोवा लि.' ही कंपनी करीत आहे. सध्या कणकवलीत रजिस्ट्रेशनसाठी बस उभी आहे. एसी असलेली सेमीलक्झरी बस आतापर्यंत देशातील कोणत्याही परिवहन सेवेत दाखल झालेली नाही. दादर-पुणे मार्गावर 'शिवनेरी' ब्रँडची बससेवा आहे. 'शीतल' ही बससेवा दादर-पुणे मार्गावर यशस्वी होईल, असा विश्वास एसटीतील अधिकाऱ्यांना आहे. सध्या शीतल ब्रँडची एकच बस आहे. प्रायोगिक तत्वावरील ही बससेवा यशस्वी झाल्यावर इतर भागातही ती सुरू करण्याची एसटी महामंडळाची योजना आहे.

3 comments:

  1. A very good concept, which was first tried out by Ka.SRTC. The concept clicked really well, and KSRTC charges a slight premium over the express fares. Interestingly, the buses in Karnataka is also called "Sheetal". They are built on 12M Ashok Leyland Chassis, with bodies from Veera/Prakash/Central Works.

    Please get some pics as soon as the bus hits the roads, please :)

    ReplyDelete
  2. Fantastic concept. Hope it will click!!! Thanks for this information guys!

    ReplyDelete
  3. here is the link for 'SHEETAL':
    http://www.msrtccontent.in/content/pdf/SheetalMarathi.pdf

    ReplyDelete