Thursday, June 23, 2011

एसटीची ‘माइल्ड स्टील’ बस आजपासून धावणार

पहिला प्रवास पुणे ते गणपतीमुळे
मुंबई, २२ जून / प्रतिनिधी

प्रदीर्घ काळापासून चर्चेत असलेली एसटीची माईल्ड स्टीलचा वापर केलेली पहिली बस उद्यापासून रस्त्यावर धावणार आहे. गेल्या ६३ वर्षांच्या इतिहासात प्रथमच एसटीने बस बांधणीसाठी अ‍ॅल्युमिनियमऐवजी अन्य धातूचा पत्रा वापरला आहे. प्रवासी सुरक्षिततेला प्राधान्य देऊन एसटीने उचललेले हे मजबूत पाऊल कितपत किफायतशीर ठरणार यावर माईल्ड स्टीलच्या बसेसचा पुढील प्रवास अवलंबून राहणार आहे.
ही साधी परिवर्तन बस एसटीच्या दापोडी येथील कार्यशाळेत बांधण्यात आली असून टप किंवा छताचा भाग वगळता या बसचा संपूर्ण सांगाडा माईल्ड स्टीलमध्ये बांधण्यात आला आहे. टपासाठी मात्र अल्युमिनियमचाच वापर करण्यात आला आहे. अन्य परिवर्तन बसप्रमाणे तिच्यातील आसनव्यवस्था ‘टू बाय टू’ अशी आहे. ‘एसटीच्या इतिहासात माईल्ड स्टीलचा वापर असलेली ही पहिली बस असून उद्यापासून ती पुणे-महाबळेश्वर-गणपतीपुळे या मार्गावर धावणार आहे’, अशी माहिती एसटीतील सूत्रांनी दिली.
या नव्या बसखेरीज माईल्ड स्टीलचा वापर करून एसटीतर्फे आणखी पाच बसेस बांधण्यात येत आहेत. या बसेस येत्या महिन्याभरात रस्त्यांवर येतील, असे सांगून या बसेसच्या मजबुतीची चाचपणी करण्यासाठी त्या राज्याच्या विविध भागांत चालविण्यात येतील, असे सूत्रांनी स्पष्ट केले. आजमितीला एसटीच्या ताफ्यात सुमारे १६ हजार बसेस असून त्यापैकी बहुतांश बसेस एसटीच्या कार्यशाळांमध्ये बांधण्यात येतात. मात्र त्यासाठी आजवर केवळ अ‍ॅल्युमिनियमचा वापर करण्यात येत होता.
माईल्ड स्टीलच्या तुलनेत अ‍ॅल्युमिनियम स्वस्त असले तरी तितकेसे मजबूत नाही. परिणामी अपघातांमध्ये एसटी बसेसचे मोठे नुकसान होते. त्याचबरोबर प्रवासी सुरक्षितताही धोक्यात येते. ही बाब लक्षात घेऊन एसटीने अ‍ॅल्युमिनियमऐवजी माईल्ड स्टीलच्या वापराचा निर्णय घेतला आहे. ‘या बसेसच्या बांधणीसाठी नव्या बसच्या बांधणीसाठी पारंपारिक बसच्या तुलनेत एक लाख रुपये जास्त म्हणजे १४ लाख ७५ हजार रुपये खर्च आला’, असेही एसटीतर्फे सांगण्यात आले.

— Loksatta

Tuesday, June 21, 2011

वोल्वो आणि लाल डब्याची एक कविता सापडली एका वेबसाइट वर! धन्यवाद!!!
http://globalmarathi.com/BlogDetails.aspx?BlogId=4996572678616555574&OId=4929045550673275145