माती लाल असो वा काळी, महाराष्ट्राच्या कानाकोपरयातील सगळ्या रंगाची चाकधुळ झाडणारी लाल एस्.टी बस कुणाच्या परिचयाची नाही? आता तीने प्रवास करणे कुणाकुणाला आवडत नाही, वा निव्वळ नाईलाज म्हणून बोटे मोडत तीनेच प्रवास करणारी माणसे ही कमी नाहीत, पण या लोकां व्यतिरिक्त जीने लहानपणापासुन आपणांस आपल्या दुर्गम गावांमध्ये निमुटपणे पोहोचविले, ठिकठिकाणची माणसे आणि लोकजीवन यांच्या दर्शनातून भाव-विश्व खुलवले म्हणून तिच्याबद्द्ल आपुलकी वाटणारी लोकंही या महाराष्ट्रामध्ये आहेत.त्यापैकीच आम्ही तीन जण म्हणजे,
अमित ग.करमरकर (ठाणे)
शेखर म. सिधये (ठाणे)
कुलदीप दि. गांधी (डोंबिवली).
आम्हा तिघांची ही गावे कोंकणा मध्येच, अनुक्रमे दापोली, केळशी, खेड, त्यामुळे एस् टी शी ऋणानुबंध हा लहानपणापासुनच जुळलेला, पुढे वाढत्या वयानुपरत्वे आणि प्रवास या बरोबरच तो वाढत गेला. त्यामुळेच आम्ही ठरवले की आपण वेगवेगळ्या एस्.टीं चे फोटो काढायचे आणि एस्.टी ची माहीती तसेच वेगवेगळे अनुभव सांगणारा ब्लॉग तयार करायचा. आणि या आमच्या उपद्व्यापात आम्ही इतर एस्.टी वेड्यांना देखील त्यांचे फोटो, सुचना व लेख, जुनी तिकीटे ,एस्.टी विषयक संग्राह्य वस्तूंचे फोटो यासहीत अगदी आनंदाने आमंत्रित करत आहोत.
:D

