एसटी तिकीट आरक्षण ऑनलाइन
एसटी डेपोतल्या रांगा... तासन्तास रांगेत उभे राहूनही गावाकडे जाण्यासाठी तिकीट मिळेलच याची खात्री नाही... मे महिना आणि गणपतीला कोकणात जाण्यासाठी एसटीच्या तिकिटासाठी उडणारी झुंबड... या सर्वांवर उपाय म्हणून एसटी महामंडळाने घरबसल्या तिकीट आरक्षण सुविधा दिली आहे. ८ जानेवारीपासून एसटी महामंडळ हे विमान कंपन्या आणि रेल्वेप्रमाणे ऑनलाइन आरक्षणाच्या श्रेणीत जाणार आहे. मुख्यमंत्री अशोक चव्हाण यांच्या हस्ते या योजनेचे उद्घाटन होणार असल्याचे महामंडळाचे व्यवस्थापकीय संचालक ओ पी. गुप्ता यांनी सांगितले. 'ट्रायमॅक्स' या खासगी कंपनीच्या मदतीने ऑनलाइन रिझव्हेशन सिस्टिम सुरू होत आहे. एसटीच्या बेवसाइटवर तिकिटांचे आरक्षण करता येईल. महाराष्ट्रातल्या कोणत्याही गावातून कोणत्याही गावात जाण्याचे आणि येण्याचे तिकीट आरक्षित करता येईल. २६ ठिकाणाहून सुटणाऱ्या २८०० एसी-नॉस एसी, एशियाड आणि साध्या अशा कोणत्याही बसचे ऑनलाइन आरक्षण होईल. घरी कम्प्युुटर नसला तरी कोणत्याही सायबर कॅफेत जाऊन कोणत्याही डेबिट कार्डवर तिकीट आरक्षित होईल. याचा फायदा खास करून मुंबई-पुणे आणि पुणे-मुंबईच्या प्रवाशांना सर्वाधिक होईल असा अंदाज आहे. कारण, या मार्गावर प्रवास करणारे प्रवासी 'कम्प्युटर सेव्ही' आहेत. एसटीच्या सोळा हजार बसेसमधून दररोज सुमारे ६५ लाख प्रवासी दररोज प्रवास करतात.
Subscribe to:
Post Comments (Atom)
No comments:
Post a Comment