Thursday, March 25, 2010

एसटीचे तिकीट तीन मिनिटांत मोबाइलवर!
एसटी
महामंडळाने केवळ तीन मिनिटांत एसटीचे तिकीट मोबाइल फोनवर देण्यास सुरुवात केली आहे. त्यासाठी सध्या प्रवाशांच्या मोबाइलमध्ये जीपीआरएस सिस्टिम व स्वत:च्या ई-मेल आयडीची गरज असली तरी, भविष्यात मोबाइलवर आलेला तिकीटचा पीएनआर क्रमांक दाखवून थेट तिकीट विकत घेण्याची सुविधा उपलब्ध होण्याची शक्यता आहे.
मोबाइलद्वारे तिकीट आरक्षण योजनेचे उद्घाटन परिवहन मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांच्या हस्ते मंगळवारी झाले. यावेळी उपाध्यक्ष दीपक कपूर उपस्थित होते. ज्यांच्याकडे जीपीआरएस नाही किंवा ई मेल नाही त्यांनी महामंडळाच्या अधिकृत एजंटकडे जाऊन या योजनेअंतर्गत तिकीट आरक्षण करावे, अशी सूचना विखे-पाटील यांनी केली. या आधी कर्नाटकने ही सुविधा सुरू केली असून त्यानंतर महाराष्ट्राचा नंबर लागतो अशी माहिती महामंडळाचे उपाध्यक्ष दीपक कपूर यांनी दिली.
मुंबईत ९० ते ९५ लाख मोबाइलधारक आहेत. त्यातील अनेकांकडे जीपीआरएस सिस्टिम आहे. साडेतीन मिनिटांत मोबाइलवर तिकीट आरक्षित होईल. मात्र तिकीट आरक्षित करताना स्वत:चा ई मेल आयडी द्यावा लागेल. ई तिकीट मेल केले जाईल. त्याचा प्रिंट आऊट घ्यावा लागेल. प्रवाशांना अडचणी आल्या तर १८००२२१२५० या टोल फ्री क्रमांकावर संपर्क साधण्याचे आवाहन त्यांनी केले.
....... ....... ....... ....... ....... ....... ....... ....... ....... .......
असे
करा आरक्षण...

* atom अशी अक्षरे टाइपकरून 54959 या क्रमांकावर एसएमएस करा. * त्यानंतर www.atomtech.in/download.aspx या साइटवर जाऊन तिकीट आरक्षणाची प्रक्रिया सुरू होईल. स्वत:चा पीन, बसचा मार्ग, तारीख तपशील, ई मेल आयडी व क्रेडीट कार्ड क्रमांक टाईप करून पाठवून द्या. तिकीट मोबाइलच्या स्क्रीनवर येईल. काही काळानंतर तुमच्या मेलवर तिकीट येईल. त्याचा प्रिंटआऊट काढावा लागेल. प्रवासाच्या तीस दिवस अगोदर ते एक तास अशा कालावधीत तिकीट आरक्षित करता येईल.
....... ....... ....... ....... ....... ....... ....... ....... ....... .......
* एसटीची फ्लिट बससेवा
फ्लिट बससेवा सुरू करण्याचा मनोदय परिवहन मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी जाहीर केला असून खासगी विमान कंपन्यांमध्ये स्पर्धा निर्माण झाली, त्याचप्रमाणे एसटी महामंडळाला स्पधेर्त येण्यासाठी फ्लिट बसेसेवेची योजना असल्याचे त्यांनी सांगितले. ते म्हणाले, आरामदायी प्रवासासाठी जादा पैसे मोजण्याची प्रवाशांची तयारी आहे. त्यामुळे अधिक चांगल्या बसेस आणण्यात येतील. भविष्यात एक हजार बसेस विकत घेण्याची योजना आहे. त्यासाठी ग्लोबल टेंडर मागवण्यात येतील. यापुढे सर्व बसेस एअर सस्पेंन्शनच्या असतील. फ्लिट बस योजनेच्या धोरणाबाबत अधिक तपशील देण्यास त्यांनी नकार दिला.

No comments:

Post a Comment