Thursday, November 5, 2009

Buses at Nagpur CBS


Here are some good photos of ST buses standing at Nagpur CBS. Ethical considerations demand that I confess I have taken these photos from internet and haven't clicked them myself.




Sakoli - Aurangabad







Katol - Aheri


















Nagpur - Pandharkavda

















Nagpur - Brahmapuri

Wednesday, November 4, 2009

एस.टी.ची मध्यप्रदेशातील सेवा २७ ऑक्टोबरपासून बंद

http://www.loksatta.com/index.php?option=com_content&view=article&id=18817:2009-10-27-18-16-58&catid=45:2009-07-15-04-01-33&Itemid=56

मध्य प्रदेशातील खाजगी वाहतूकदारांच्या मनमानी धोरणाच्या निषेधार्थ महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळाने २७ ऑक्टोबर , रात्री १२ वाजतापासून एस.टी.ची मध्य प्रदेशातील सेवा बंद करण्याचा निर्णय घेतला आहे. त्याचा फटका विदर्भातून मध्यप्रदेशात जाणाऱ्या प्रवाशांना बसण्याची शक्यता आहे.चुकीच्या ठिकाणी वाहने उभी केल्याप्रकरणी एस.टी.च्या सहा चालक, वाहकांना अलीकडेच मध्यप्रदेश पोलिसांनी अटक केली व वाहने ताब्यात घेतली. हा निर्णय अन्यायकारक असल्याचे राज्य परिवहन मंडळाचे मत आहे. मध्यप्रदेशमध्ये शासनाची बस सेवा नाही; संपूर्ण सार्वजनिक वाहतूक खाजगी वाहतूकदारांकडे कंत्राटी पद्धतीवर देण्यात आली आहे. महाराष्ट्र शासनाच्या बससेवेमुळे खाजगी वाहतूकदारांच्या उत्पन्नावर परिणाम होत असल्याने ते संतप्त होते. त्यामुळे त्यांच्याच तक्रारीवरून इंदोर पोलिसांनी महाराष्ट्रातून गेलेल्या एस.टी. कर्मचाऱ्यांवर कारवाई केल्याचा दावा राज्य परिवहन मंडळाने केला आहे. राज्यातील कर्मचाऱ्यांना मध्यप्रदेश पोलीस अशा प्रकारे त्रास देत असतील आणि त्यात मध्यप्रदेश सरकार हस्तक्षेप न करता खाजगी वाहतूकदारांच्या बाजूने उभे राहात असेल तर सेवा बंद करण्याशिवाय पर्याय नाही, या निर्णयाप्रत राज्य परिवहन मंडळाचे अधिकारी आल्याने त्यांनी महामंडळाच्या मुंबई मुख्यालयाने एस.टी.ची मध्यप्रदेशातील सेवा बंद करण्याचा निर्णय घेतला आहे. या निर्णयाची अंमलबाजावणी उद्या मंगळवारी रात्री १२ वाजतापासून होणार आहे. महाराष्ट्र आणि मध्यप्रदेश या राज्यादरम्यान सांस्कृतिक संबंध असून इंदूर, जबलपूर, सिवनी या शहरांमध्ये मोठय़ा प्रमाणावर मराठी बांधव राहतात. एकेकाळी नागपूर ही मध्य भारताची राजधानी राहिली असल्याने मध्य प्रदेशातील अनेक शहरांशी नागपूरचे राजकीय, सामाजिक, शैक्षणिक आणि व्यापारी संबंध आहे. त्यामुळेच महाराष्ट्राच्या अन्य शहरांप्रमाणे नागपूर, अमरावती येथून मध्यप्रदेशातील विविध शहरासाठी एस.टी.च्या फेऱ्या सुरू आहेत. तसेच मध्यप्रदेशातील खाजगी बसेसही राज्यात धावतात. विशेष बाब म्हणजे मध्य प्रदेश राज्य मार्ग परिवहन महामंडळाचे नागपुरात एक आगारही आहे. महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळाच्या नागपूर आणि अमरावती येथून मध्य प्रदेशातील विविध शहरात सुमारे ५० बसेस दररोज ये-जा करतात. यामध्ये नागपूर येथून भोपाळ, पांढुर्णा, इंदूर, जबलपूर, पचमढी, कान्हा किसली, छिंदवाडा, रामाकोना, सौंसर, सिवनी, बेरडी, मंडला, बालाघाट शहरासाठी महाराष्ट्राच्या बसेस धावतात. अमरावती येथून इंदूर, पांढुर्णा, छिंदवाडा, सिवनी, मुलताई, भोपाळ खंडवा, बैतुल आदी शहरांसाठी बसेस उपलब्ध आहेत.

या सर्व बसेस मंगळवारपासून मध्यप्रदेशच्या सीमेवरील बस थांब्यापर्यंत जातील, अशी माहिती नागपूरचे विभागीय वाहतुक नियंत्रक सुर्यकांत अंबाडेकर यांनी ‘लोकसत्ता’शी बोलताना दिली.

Tuesday, November 3, 2009

ST in Vidarbha

In my weekend trip from Nagpur to Tadoba, I saw these ST buses on way. All these pictures are full-size and you can click on them to view a bigger image.



























Gondia - Yavatmal bus at Butibori near Nagpur. It is turning towards Wardha, leaving the Nagpur - Hyderabad highway.



--------





ST's new green mini-bus travels from Nagpur to Hinganghat. The colour looks nice but I was disappointed that they had chosen to dilute the strong brand association with 'red' that ST travellers have always had.


























-------




Aheri - Amravati bus seen on Warora- Jamb road. (The destination board is not very clear.)























-------



Chandrapur - Nagpur bus begins its journey through Chandrapur town.




Wednesday, October 28, 2009

Daredevil ST !!






ST negotiates narrow bridges, killer hairpin-bends and steep slopes on Devgad - Kunakeshwar road in Sindhudurg district.

I clicked these pictures of the deftly-moving ST bus (Buddhwadi - Devgad) just as my Maruti 800 gave up and spluttered to a halt on the agonising slope..!!

This is perhaps among the most difficult stretches ST deals with every day. The road is tricky and is simply not meant for huge, bulky ST buses. Yet, they continue to ferry passengers without complaint, day in- day out.

Can you see the lush, dense mango orchards that overhang on to the road from either side?



Saturday, October 24, 2009

ST's dinner break at ' Hotel Raigad Inn'



My late-evening Kolhapur - Pune ST bus takes a dinner break at 'Hotel Raigad Inn'..

ST at Toll Booth !



Semi-luxury ST Buses at Taswade Toll Plaza near Karad.

Buses at Pune Station Bus Stand


Miraj - Pune, Pune- Chiplun buses and a Kadamb (Goa) Corporation bus at Pune Station bus stand.

Instructions for drivers..!





Seen at Khandala-Pargaon bus depot in Satara district.

Atit Bus Stand



Miraj - Mumbai, Swargate- Kolhapur and Kolhapur- Swargate buses standing at Atit Stand (Satara District) on Pune - Bangalore highway.

Thursday, October 22, 2009

ST's tea break...!


After climbing the difficult Phonda Ghat, Kankavali - Nipani bus takes a 15-minute tea break at Radhanagri bus stand in Kolhapur district.

Among regular ST travellers Radhanagri is known for the awesome Mirchi Bhajjis, served piping hot by the age-old vendor..!


ST by the lake !!


Solapur - Panaji - Vasco bus passes by the backwaters of Radhanagri Dam.


Wednesday, September 16, 2009

CNG Buses.

एसटीच्या ताफ्यात ६० सीएनजी बस
टू बाय टू सीटची रचना... ४५ सीट... डबल डोअर... आणि महत्त्वाचे म्हणजे इंधनासाठी पर्यावरणाला अनुकूल असा सीएनजी गॅस... अशी सारी वैशिष्ट्ये असलेल्या तब्बल ६० बस एसटी महामंडळाच्या ताफ्यात दाखल होत असून या महिनाअखेरीस त्या मुंबई-पनवेल-वाशी मार्गावर तसेच पुणे परिसरात धावू लागतील. 

सीएनजीवर धावणाऱ्या २५० बस वर्षअखेरीपर्यंत ताफ्यात दाखल करण्याचे उदिष्ट महामंडळाच्या डोळ्यांपुढे आहे. त्यातील दोन बसगाड्या मध्यंतरी मुंबई-पनवेल मार्गावर प्रायोगिक तत्त्वावर सुरू करण्यात आल्या. त्या थ्री बाय टू सीटच्या आणि सिंगल डोअरच्या होत्या. त्यांचा प्रवास कमी अंतराचा असल्याने प्रवासात येणाऱ्या बसस्टॉपची संख्या मोठी आहे. अशा परिस्थितीत एकाच दरवाजातून उतरताना खूप गदीर् होत असल्याने दोन दरवाजे करण्याची मागणी प्रवाशांकडून आली. एसटीच्या औरंगाबाद व पुण्याच्या वर्कशॉपमधील इंजिनीअर मंडळींनी त्यानुसार बसच्या रचनेत बदल केले. या नव्या रचनेच्या पहिल्या पाच बसगाड्या शनिवारपर्यंत ताफ्यात सहभागी होतील. एकूण साठ बसगाड्या ताफ्यात सामील होणार आहेत, अशी माहिती महामंडळाचे उपाध्यक्ष व व्यवस्थापकीय संचालक ओम प्रकाश गुप्ता यांनी दिली. 

त्यातील १५-२० बसगाड्या पुण्यासाठी तर इतर मुंबईसाठी असतील. अशोक लेलँडच्या ४६, आणि टाटा मोटर्सच्या १४ बसगाड्यांचा त्यात समावेश आहे. डिझेलवर धावणाऱ्या बसची किंमत सर्वसाधारणपणे साडेदहा लाख रुपये आहे. सीएनजी बसची किंमत १५ ते १५.५ लाखांच्या घरात आहे. एकदा गॅस भरला की बस सुमारे ३०० ते ३५० किमीपर्यंत धावते. 

Maharashtra Times, 16 Sep 2009


Wednesday, July 29, 2009

Good news...just read it in Maharashtra Times.

घरबसल्या एसटी तिकीट
29 Jul 2009, 0714 hrs IST 

लालडबा, खटारा अशी हेटाळणी केल्या जाणाऱ्या एसटी महामंडळाने आता नव्या युगाचा रस्ता धरला आहे. आरामदायी किंगलाँग, व्होल्व्हो बस ताफ्यात दाखल केल्यानंतर आता एसटीने कोणत्याही गावात जाण्यासाठी इंटरनेटवर घरबसल्या तिकीट देण्याची व्यवस्था केली आहे. येत्या तीन महिन्यांत ही योजना सुरू होणार असून त्यामुळे लांबवरचा एसटी डेपो गाठून रांग लावण्याची कसरत बंद होणार आहे. 

एसटीने इलेक्ट्रॉनिक्स रिझव्हेर्शन सुरू करून प्रवाशांचा वेळ वाचावा यासाठी नव्या योजना आणल्या. आता ई तिकिटींग सुरू होत आहे. येत्या तीन महिन्यांत ही योजना कार्यान्वित होईल, असे महांडळाचे व्यवस्थापकीय संचालक ओ. पी. गुप्ता म्हणाले. बीओटी तत्त्वावर 'ट्रायमॅक्स इन्फ्रास्ट्रक्चर लिमिटेड 'ही संपूर्ण नवी सिस्टीम तयार करीत आहे. प्रत्येक तिकिटामागे या कंपनीला २१ पैसे मिळतील.
 

असे होणार बूकिंग
 
एसटीच्या (www.msrtc.gov.in) या साइटवर जाऊन कोणत्याही शहरातून कोणत्याही शहरातील डेपोत जाण्यासाठी एसटीचे बूकिंग करता येईल. तिकीट आरक्षित केल्यावर क्रेडिट कार्डमार्फत तिकिटाचे पैसे अदा करायचे. तिकीट आरक्षित झाल्यावर 'प्रिंट आऊट' काढायची आणि प्रवासात कंडक्टरला हेच तिकीट दाखवायचे.
 
.........
 

इलेक्ट्रॉनिक तिकिटिंग
 
सध्या मुंबई सेंट्रल ते स्वारगेट, सातारा, अलिबाग, भिवंडी मार्गावर 'इलेक्ट्रॉनिक्स तिकिट इश्युइंग मशिन'मार्फत तिकीट देण्यास सुरुवात झाली आहे. कंडक्टर या मशिनद्वारे तिकीट देतो. यामुळे कंडक्टरचा वेळ वाचतो. सध्या तिकीट देण्यासाठी कंडक्टरला दीड तास लागतो. पण या मशिनमुळे पंधरा मिनिटांत काम होते. दोन रुपयांपासून दहा, वीस रुपयांच्या वेगवेगळ्या तिकिटांऐवजी एकच तिकीट दिले जाते. ट्रायमॅक्स कंपनीला एका तिकिटामागे २१ पैसे मिळतात. मुंबई डिव्हिजननंतर सर्व २४७ डेपोतील कंडक्टरना ही मशिन दिली जातील. एक मशिनची किंमत सुमारे दहा हजार रुपये असून ट्रायमॅक्स कंपनी यासाठी ८० ते ९० कोटी रुपये गुंतवणार
 

 

>> राजेश चुरी 

Monday, July 27, 2009


सामाजिक एकीकरणाचे एक प्रतीक: छोटी छोटी गावे मोठ्या शहरा ला जोडणारी एस टी.

Monday, June 15, 2009


On the Mumbai-Goa highway MH-17.



A ST bus snap taken from Bankot. Bankot-Velas road is one of the few roads with a fantastic view of the sea.