A Nagpur-Nanded ST suffered breakdown yesterday, when accelerator cable broke somewhere after Deoli, Wardh district. Passengers were boarded into another Nagpur-Nanded ST comming 30 minutes behind. Dont know what happened to failed bus after.
Friday, January 24, 2014
Wednesday, August 29, 2012
Some buses asorted from my collection.
Some photos of buses clicked on the Mumbai-Goa Highway
A ST bus from Mangaon Depot flaunting "Mi Mangaonkar" written on it
Andheri-Bandra!...no it is "Wandra". A bus at Panvel
A Parel-Khursundi bus at Panvel bus stand
Borivali-Thane-Satara Semiluxury bus on Mumbai-Pune Expressway
A local bus on the Mulshi-Lonavla road
Friday, August 3, 2012
कोकणात पुन्हा लेलॅंडच्या एसटी बसेस धावणार
http://online2.esakal.com/esakal/20120803/5281412122870622291.htm
स्पेअरपार्टची कमतरता आणि कोकणातील चढ-उताराच्या रस्त्यावर सातत्याने "ब्रेकडाऊन' होणाऱ्या बसेस ही सिंधुदुर्गासह कोकणातील इतर जिल्ह्यांतील परिस्थिती आता बदलणार आहे. कोकणातील रस्त्यांवर पूर्वीप्रमाणेच लेलॅंड कंपनीच्या बसेस धावणार असल्याने प्रवाशांना चांगली सेवा मिळण्याची अपेक्षा आहे. येत्या डिसेंबरपासून याबाबतची कार्यवाही करण्याचा निर्णय एसटी प्रशासनाने घेतला आहे.
एसटी महामंडळाच्या ताफ्यात टाटा आणि लेलॅंड कंपनीच्या बसेस आहेत. यात कोकणातील चार जिल्ह्यांसाठी लेलॅंड कंपनीच्या बसेस ठेवण्यात आल्या होत्या. येथील चढ-उतार, वळणाचे रस्ते तसेच अतिपावसाच्या कालावधीत त्या चांगल्या सेवा बजावत होत्या; मात्र एसटी महामंडळाचे तत्कालीन अध्यक्ष श्री. खोब्रागडे यांच्या कार्यकाळात उर्वरित महाराष्ट्राप्रमाणे कोकणातही टाटा कंपनीच्या बसेस सुरू केल्या. सिंधुदुर्गालगतच्या गोवा राज्यात या बसेसची बांधणी होऊ लागली. गेली पाच वर्षे या कंपनीच्या बसेस कोकणातील मार्गावर सुरू असल्या तरी त्या सातत्याने "ब्रेकडाऊन' होण्याचे प्रमाण वाढले. तसेच या कंपनीच्या बसेसचे स्पेअरपार्ट कोकणातील जिल्ह्यात उपलब्ध होत नसल्याने एसटी महामंडळाची डोकेदुखी आणखीच वाढली. एकाच वेळेस अनेक बसेस दुरुस्तीसाठी बंद राहत असल्याने त्याचा परिणाम वाहतूक सेवेवरही होऊ लागला. तसेच भारमानही घटले. एसटीच्या उत्पन्नावर त्याचा परिणाम होऊ लागल्यानंतर कोकणातील मार्गावर लेलॅंड कंपनीच्या बसेस पुन्हा सुरू करण्याचा धोरणात्मक निर्णय एसटी महामंडळाने घेतला आहे, तर उर्वरित महाराष्ट्रासाठी टाटा कंपनीच्या बसेस सुरू ठेवल्या जाणार आहेत. एसटी महामंडळाच्या या निर्णयामुळे चालक-वाहकांसह दुरुस्ती कारागिरांमध्ये समाधान व्यक्त होत आहे. सपाट रस्त्यावर सध्याच्या बसेसमध्ये फारशी बिघाडाची समस्या उद्भवत नाही; मात्र चढ-उतार, रस्त्यावरील खड्डे यातून वाहतूक करताना सध्याच्या बसेस नादुरुस्त होण्याचे प्रमाण वाढले होते. तुलनेत जुन्या लेलॅंड कंपनीच्या बसेस चांगली सेवा देत असल्याचे एसटी कर्मचाऱ्यांचे म्हणणे होते.

Saturday, July 7, 2012
Friday, June 22, 2012
एसटीचा 'कॅरिअर' इतिहासजमा होणार?
http://www.esakal.com/esakal/20120622/5722942237507803852.htm
एकेकाळी टपावर मोठ-मोठ्या बॅगा मिरवत धावणारी एसटी आता अभावानेच दिसते. एसटीवरील कॅरिअरचा वापर करण्याचे प्रमाण कमी झाले आहे. त्यामुळे टपावरील कॅरिअर काढून आरामबसप्रमाणे गाडीच्या तळाशी सामान साठवणुकीची व्यवस्था करण्याचा विचार एसटी महामंडळ करीत आहे. तसे झाल्यास एसटीच्या प्रवासातील तो आणखी एक बदल ठरेल.
एकेकाळी एसटीच्या टपावर सामान सुरक्षित ठेवण्यासाठी वापरली जाणारी कापडी ताडपत्री आता दिसेनासी झाली आहे. नव्याने आलेल्या एसटीच्या टपावरील कॅरिअरची जागाही आता कमी झाली आहे. लांबपल्ल्याच्या मार्गावर धावणाऱ्या गाड्यांच्या टपावरील सामानही आता कमी झालेले दिसते. त्यामुळे भविष्यात एसटीच्या टपावरील कॅरिअरच काढून टाकून खासगी आराम गाड्यांप्रमाणे गाड्यांच्या तळाच्या भागात सामानासाठी बंदिस्त जागा (डिकी) करावी का, अशा विचाराधीन महामंडळ असल्याचे दिसते.
एसटी ही सर्वसामान्यांचे प्रवासाचे साधन म्हणून त्याकडे पाहिले जाते. "बहुजन सुखाय, बहुजन हिताय' याबरोबर "प्रवाशांच्या सेवेसाठी एसटी' अशी काही त्याची ब्रीदवाक्ये आहेत. ग्रामीण भागात आजही सर्वसामान्यांना एसटीचाच आधार असतो. कोणतीही कुरकूर न करता नियोजित थांब्यावरून प्रवाशांची वाहतूक सुरू असते. एसटीच्या रचनेत कालानुरूप अनेक बदल होत गेले. एसटीत चढण्यासाठी सुरवातीला पाठीमागे असलेला दरवाजा आता नव्याने आलेल्या गाड्यांना पुढे ठेवण्यात आला आहे. पूर्वी एसटीची आसन रचनाही विशिष्ट पद्धतीची होती. "थ्री बाय टू' अशी रचना होती. आता "परिवर्तन' नावाने आलेल्या एसटीमध्ये आसन रचना "टू बाय टू' करण्यात आली. प्रवाशांच्या सोयीसाठी खासगी आराम गाड्यांप्रमाणे निमआराम गाड्या तसेच कमी भारमानाच्या मार्गासाठी मिडीबस काढल्या गेल्या. जुन्या काळात एसटीचा टपावरील सामान वाहतुकीसाठी असलेले कॅरिअरही बरेच लांबलचक व मोठे होते. त्या वेळी सामानाची वाहतूकही मोठ्या प्रमाणात होत असे. एसटी पार्सल वाहतूक सेवा तेजीत असायची. वाहतूक सेवा (ट्रान्स्पोर्ट) निर्माण होण्याआधी व्यापाऱ्यांचा मालही एसटी पार्सलनेच येत असे. यासाठी एसटीमध्ये स्वतंत्र पार्सल विभाग कार्यरत असे. एका ठिकाणाहून पार्सल केल्यावर त्याची पार्सल करणाऱ्याला पावती (रिसीट) दिली जात असे. ती पावती ज्याला माल पाठवलेला असायचा त्याला पोस्टाने पाठविली जात असे. त्यावेळी त्या पावतीवरून आपले पार्सल आल्याचे संबंधितांना समजत असे. त्या पावतीवरील व एसटीच्या पार्सल विभागात आलेल्या पार्सलवरील क्रमांक जुळल्यावरच पार्सल विभाग संबंधितांना पार्सल देत असे अशी सर्वसाधारण रचना असे. त्यानंतर वाहतूक सुविधा विस्तारित झाल्यानंतर एसटीचा पार्सल विभाग हळूहळू बंद झाला. त्यामुळे पूर्वी एसटीच्या टपावरील कॅरिअर मोठे असे. सामानाची वाहतूकही मोठ्या प्रमाणात होत असे. सामान वाहतुकीसाठी एसटी हाच एक आधार असे. त्या वेळी पावसाळ्यात टपावरील सामान भिजू नये, यासाठी ताडपत्र्यांची सोय असे. विशेषतः लांबपल्ल्याच्या गाड्यांवर ताडपत्र्यांची सोय असायची. त्यानंतर नव्याने दाखल झालेल्या एसटीच्या टपावरील कॅरिअरची जागा कमी झाली. याचबरोबरच ताडपत्र्याही गायब झाल्या. त्यामुळे एसटीच्या खर्चात मोठी बचत झाली. आवश्यक तेव्हा स्थानिक पातळीवर प्लास्टिक कागद उपलब्ध करून दिले जात. आता तर एसटीच्या टपावरील सामान वाहतुकीची कॅरिअरच काढून टाकावे, या विचाराधीन महामंडळ आहे. कॅरिअरमुळे गाड्यांच्या गळतीचे प्रमाण वाढून त्यावर वारंवार खर्च करण्याची वेळ येते. खासगी आराम गाड्यांमध्ये सामान ठेवण्यासाठी बाजूला व मागे असलेल्या जागेप्रमाणे बंदिस्त जागा ठेवावी का, या विचारात महामंडळ आहे. तसे झाले तर सामान सुरक्षित जाऊ शकेल. जादा टायर (स्टेफनी) तसेच टूलकिट आत ठेवता येईल. त्यामुळे वाटेत एसटी पंक्चर झाल्यावर करावी लागणारी कसरत थांबेल. एसटीच्या खर्चात मोठी बचत होईल. प्रवाशांनाही सामान ठेवणे तसेच स्वतःच ते हाताळणे सोपे जाईल. अशा पद्धतीची रचना करण्याबाबतचा विचार सुरू असून, लवकरच त्याचे प्रत्यक्षात रूपांतर होईल, अशी स्थिती आहे.
...तर हमालांवर गदा एसटीच्या टपावर सामान चढविण्यासाठी हमालांची गरज भासते; मात्र एसटीने खासगी आराम गाड्याप्रमाणे सामान ठेवण्यासाठी खाली बंदिस्त जागा केल्यास प्रवाशी स्वतःच आपल्या सामानाची हाताळणी करतील. पर्यायाने हमालांना काही काम न राहिल्यास त्यांच्यावर गदा येण्याची शक्यता आहे.

Wednesday, April 18, 2012
Tuesday, March 13, 2012
Tuesday, February 28, 2012
Midnight Dinner
Friday, October 21, 2011
Connecting Maharashtra - 10 (End to End)
Saturday, October 15, 2011
Via Vidarbh and Nagpur
Thursday, September 8, 2011
Thursday, June 23, 2011
एसटीची ‘माइल्ड स्टील’ बस आजपासून धावणार
पहिला प्रवास पुणे ते गणपतीमुळे
मुंबई, २२ जून / प्रतिनिधी
प्रदीर्घ काळापासून चर्चेत असलेली एसटीची माईल्ड स्टीलचा वापर केलेली पहिली बस उद्यापासून रस्त्यावर धावणार आहे. गेल्या ६३ वर्षांच्या इतिहासात प्रथमच एसटीने बस बांधणीसाठी अॅल्युमिनियमऐवजी अन्य धातूचा पत्रा वापरला आहे. प्रवासी सुरक्षिततेला प्राधान्य देऊन एसटीने उचललेले हे मजबूत पाऊल कितपत किफायतशीर ठरणार यावर माईल्ड स्टीलच्या बसेसचा पुढील प्रवास अवलंबून राहणार आहे.
ही साधी परिवर्तन बस एसटीच्या दापोडी येथील कार्यशाळेत बांधण्यात आली असून टप किंवा छताचा भाग वगळता या बसचा संपूर्ण सांगाडा माईल्ड स्टीलमध्ये बांधण्यात आला आहे. टपासाठी मात्र अल्युमिनियमचाच वापर करण्यात आला आहे. अन्य परिवर्तन बसप्रमाणे तिच्यातील आसनव्यवस्था ‘टू बाय टू’ अशी आहे. ‘एसटीच्या इतिहासात माईल्ड स्टीलचा वापर असलेली ही पहिली बस असून उद्यापासून ती पुणे-महाबळेश्वर-गणपतीपुळे या मार्गावर धावणार आहे’, अशी माहिती एसटीतील सूत्रांनी दिली.
या नव्या बसखेरीज माईल्ड स्टीलचा वापर करून एसटीतर्फे आणखी पाच बसेस बांधण्यात येत आहेत. या बसेस येत्या महिन्याभरात रस्त्यांवर येतील, असे सांगून या बसेसच्या मजबुतीची चाचपणी करण्यासाठी त्या राज्याच्या विविध भागांत चालविण्यात येतील, असे सूत्रांनी स्पष्ट केले. आजमितीला एसटीच्या ताफ्यात सुमारे १६ हजार बसेस असून त्यापैकी बहुतांश बसेस एसटीच्या कार्यशाळांमध्ये बांधण्यात येतात. मात्र त्यासाठी आजवर केवळ अॅल्युमिनियमचा वापर करण्यात येत होता.
माईल्ड स्टीलच्या तुलनेत अॅल्युमिनियम स्वस्त असले तरी तितकेसे मजबूत नाही. परिणामी अपघातांमध्ये एसटी बसेसचे मोठे नुकसान होते. त्याचबरोबर प्रवासी सुरक्षितताही धोक्यात येते. ही बाब लक्षात घेऊन एसटीने अॅल्युमिनियमऐवजी माईल्ड स्टीलच्या वापराचा निर्णय घेतला आहे. ‘या बसेसच्या बांधणीसाठी नव्या बसच्या बांधणीसाठी पारंपारिक बसच्या तुलनेत एक लाख रुपये जास्त म्हणजे १४ लाख ७५ हजार रुपये खर्च आला’, असेही एसटीतर्फे सांगण्यात आले.
— Loksatta

Labels:
Ganpatipile,
Maharashtra ST,
mild,
MSRTC,
Pune,
steel
Subscribe to:
Posts (Atom)